मानवी हक्क म्हणजे काय?
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ सालमंड यांच्या मते, कर्तव्य म्हणजे असे कार्य जे एखाद्याने केलेच पाहिजे. जसे- नोकराने मालकाची सेवा करणे, मुलाने आई-वडिलांची आज्ञा पाळणे, कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश पाळणे, इत्यादी. कर्तव्यात अशा सर्व कार्यांचा समावेश होतो जी एखाद्याने केली पाहिजे, तसेच अशी कार्ये जी. एखाद्याने करायला नकोत. आपण यांना सकारात्मक किंवा नकारात्मक म्हणू शकतो. वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत हे सकारात्मक कर्तव्य आहे; तर एखाद्या मालकाच्या खाजगी जागेत प्रवेश करणे हे असे काम आहे जे करायला नको, म्हणजेच ते नकाशत्मक कर्तव्य होय. कर्तव्ये दोन प्रकारची यासतात- पहिले नैतिक तर दुसरे कायदेशीर. कायद्याने बंधनकारक असणारे कर्तव्य म्हणजे कायदेशीर कर्तव्य, तर॒ नैतिक कर्तव्य म्हणजे असे कर्तव्य जे आपल्या बिवेकानुसार, सद्सदविवेकबुद्धीनुसार योग्य किंवा अयोग्य ठरवून आपण करतो ते. उदाहरणार्थ, अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करणे हे नैतिक कर्तव्य आहे. कायद्याने जेव्हा एखादी कृती कर्तव्य मानली जाते, तेव्हा कायदा तिच्या
अंमलनजावणीवर भर देतो व त्याकडे दुर्लक्ष केल्यास शिक्षा
करतो.
हक्क
सालमंड यांच्या मते जेव्हा आपण “अ या व्यक्तीची “ब' या व्यक्तीप्रति विशिष्ट कर्तव्ये आहेत असे म्हणतो, तेव्हा नैसर्गिकरित्या 'ब' या व्यक्तीलासुद्धा 'अ'च्या प्रति काही हक्क प्राप्त होतात. मालकाला त्याच्या नोकराप्रति, वरिष्ठ अधिकाऱ्याला कनिष्ठ अधिकाऱ्याप्रति हक्क असतात.
ते पुढे असे म्हणतात, की एखाद्या व्यक्तीला हक्क आहेत असे म्हणणे म्हणजेच ते मिळविण्याचा त्याला अधिकार आहे असे म्हणता येईल. याचे विश्लेषण करताना असेही म्हणता येईल, की इतरांनी त्या व्यक्तीला त्याचे हक्क पुरविले पाहिजेत अथवा ते मिळविण्यापासून त्याला रोखता कामा नये. हक्क हे नैतिक वा कायदेशीर असतात.
हक्क हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्याने लिहिलेली उत्तरपत्रिका तपासून
त्यावरील उत्तरे बरोबर असलेली. खूण करतो, तेव्हाच विद्यार्थ्याला त्याचे उत्तर बरोबर असल्याचे समजते. जेव्हा
आपल्या घरातील वडीलधारी व्यक्ती आपल्याला काय चांगले आणि काय वाईट आहे हे सांगत असते, तेव्हा आपण त्यांचा सल्ला योग्य मानून तसे वागण्याचा प्रयत्न करतो. हक्कांमध्ये पुढील पाच घटकांचा अंतर्भाव होतो.
- हक्क धारण करणारा (हक्कधारक), ज्याला हक्क आहेत असा;
- कोणते हक्क (हक्कांचा विषय / हेतू)
- असे हक्क जे एखाद्दी व्यक्ती मागूं शकते, त्यासाठी दावा करू शकते, त्यांचा उपभोग घेऊ शकते किंवा अमलात आणते (हक्कांचा वापर)
- एखाद्या व्यक्ती अथवा समूहाच्या विरुद्ध हक्क असणे / वापरणे (व्यक्ती वा अनेक व्यक्ती ज्यांचे त्याप्रति सापेक्ष कर्तव्य असते. )
- अशा हक्कांच्या दाव्यासाठीचा आधार (हक्कांचे समर्थन)
- हक्क कोणासाठी असतात व कोणाविरुद्ध असतात ?
व्यकती वा समूह यांना हक्क असतात. व्यक्तीला
शिक्षणाचा हक्क असतो, तसाच हक्क व्यक्तींच्या
समूहालादेखील असतो . महानगरपालिकेला योग्य
कारणांसाठी नागरिकांवर कर लादण्याचा अधिकार असतो, विशिष्ट धर्माचे पालन करण्याचा हक्क प्रत्येक कुटुंबाला असतो, एखाद्या राज्याचा वा राष्ट्राचा त्यांच्या विशिष्ट भूभागावर हक्क असतो. सुरक्षिततेच्या कारणास्तव देशाला आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये काय घडते आहे हे जाणून
घेण्याचा हक्क आहे. हंक्क आणि कर्तव्य यांच्यांतील परस्परसंबंध लक्षात घेता कायदा असे म्हणतो, की मानवाचे दुष्ट व स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी वाघ, हरिण, हत्ती वा अन्य कोणत्याही प्राण्यांची हत्या करू नये, कारण या सर्व प्राण्यांनाही मारले न जाण्याचा हक्क आहे. म्हणजेच हक्क हे
व्यकती वा समूहासाठी असतानाच ते इतर व्यकती वा समूहांच्या हक्कांशी परस्पर संबंधित असतात.
हक्कांची गरज
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मानव आणि समाज एकमेकांच्या गरजा भागवितात. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहे, हे आपणास माहीतच आहे. असे असले तरी या प्राथमिक गरजांना अनेक पदर आहेत. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी या तीन प्राथमिक गरजांव्यक्तिरिकत इतर अनेक गरजांची पूर्तता समाजाकडून होणे आवश्यक असते.
या गरजांचे पुढील चार विभाग करता येतील.
- शारीरिक गरजा
- मानसिक गरजा
- सामाजिक गरजा
- आर्थिक गरजा
वास्तविक आपण या गरजांवर आधारित समाजात
राहतो आणि या गरजांतूनच हक्कांची निर्मिती होते. म्हणून मानवी हक्क आणि मानवी गरजा यामधील संबंध आपण येथे तपासू या.
शारीरिक गरजा
जगण्यासाठी माणसाच्या शारीरिक गरजा पूर्ण होणे महत्त्वाचे असते. या गरजांमध्ये प्रामुख्याने अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि वैद्यकीय सुविधा यांचा समावेश होतो.
माणसाचा जगण्याचा हक्क सुरक्षित राहण्यासाठी या मूलभूत गरजा पुरविल्या गेल्या पाहिजेत. याशिवाय त्या पुरेशा प्रमाणात व गुणवत्तापूर्णही असायला हव्यात. सर्व माणसांना समतोल आहार, पिण्याचे शुद्ध आणि प्रदूषणविरहित वातावरण आणि समाधानकांरक घऱगुती सोयीसुविधा या
गोष्टी मिळाल्या पाहिजेत. ज्यामुळे त्यांना चांगले जीवन जगता येईल.
मानसिक गरजा
मानसिक गरजा माणसाच्या विचारप्रवृत्तींशी संबंधित
असतात. एखाद्या व्यक्तीने काय मिळविले आहे, त्याचे मानसिक समाधानं व निर्माण होणारी प्रतिष्ठेची भावना यातून मानसिक गरजा परिवर्तित होतात. माणसाचे मन भय, चिंता तसेच मानसिक ताणतणाव यांपासून मुक्त असायला हवे. ज्यामुळे ती व्यक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकेल.
उदाहरणार्थ, एखोद्या संगीतकाराला चांगले संगीत निर्माण केल्यावरच आनंद मिळतो आणि तेच त्याचे उदरनिर्वाहाचे साधन बनते. अशा वेळी त्याला चांगले संगीत निर्माण करण्याजोगे वातावरण न मिळाल्यास ते तो करू शकणार नाही. जर सुखी समाधानी व्हायंचे असेल तर चित्रकाराने चित्रे काढली पाहिजेत, कवीने कविता केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रशासन चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी व उत्तम अभिशासनाची हमी देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यावंर त्यांचे कर्तेव्य पार पाडताना कोणत्याही प्रकारचा राजकीय वा इतर दबाव नसला पाहिजे. माणसाला प्रतिष्ठेसह मानवी हक्क प्राप्त झाले पाहिजेत, जेणेकरून तो स्वतःचे ध्येय साधण्याची क्षमता विकसित करू शकेल. म्हणून कुटुंबात जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यां व्यक्तीवर दबाव आणत असेल, रागवत असेल, तेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या भावनेला व प्रतिष्ठेला धका पोहचवीत असते. अशा प्रकारात ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मानसिक गरजांना महत्त्व देत नसल्याने तिच्या सन्मानाने जगण्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करते.
सामाजिक गरजा
सामाजिक गरजा या पुरुष,स्त्रिया आणि मुले यांच्या
सामूहिक परिस्थितीत परस्परसंवादाशी निगडित असतात. ज्याप्रमाणे लहान मूल धोक्यापासून संरक्षणासाठी आपल्या. आईच्या कुशीत लपते, त्याप्रमाणे मोठ्या माणसांनाही समाजविरोधी घटकांपासून उदाहरणार्थ, चोर, भुरटे, अतिरेकी, इत्यादीपासून संरक्षणाची गरज असते.
समाजाची अशी अपेक्षा असते, की प्रत्येकाने सतत
परस्परसहकार्य भावनेने काम करावे, जेणेकरून माणसे समाजाशी एकरूप होऊ शकतील व त्यातून त्यांच्यात समाजाबद्दल आपलेपणाची भावना निर्माणं होईल. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला तिच्या देशाचा नागरिक असण्याचा हक्क असतो. हा मानवी हक्क त्या मूलभूत हक्कांपैकी आहे जो
तिला देशाच्या कुठल्याही भागात राहण्याचा, तसेच
वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार देतो. याबरोबरच आंतराष्ट्रीय करारनामे आणि कायद्यांमुळे ती व्यक्ती जगाच्या कोणत्याही. भागात संचार करू शकते आणि आपल्या मूलभूत हक्कांचा लाभ घेऊ शकते.
आर्थिक गरजा
आर्थिक गरजा या मानवास जीवन जगण्यासाठी आणि चांगल्या राहणीमानासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. आधुनिक समांजात आपल्या बहुतांश गरजा पैशानेच भागतात; एवढेच नव्हे तर पैसा ही माणसांची आज एक मूलभूत गरज बनली आहे. पैशाच्या उपलब्धतेशिवाय कोणतेही छोटे मोठे व्यवहार होऊ शकत नाहीत.
खरे तर पैशाला समाजात अनेक पैलू आहे. ते असे साधन आहे, की ज्याच्या साहाय्याने माणसाच्या सर्व आर्थिक गरजा भागविल्या जातात. कामाचा हक्क, समान कामासाठी समान वेतन हे हक्क माणसाच्या आर्थिक गरजांमधून किंवा सुखाच्या शोधातून निर्माण झालेले आहेत.
खरे तर पैशाला समाजात अनेक पैलू आहे. ते असे साधन आहे, की ज्याच्या साहाय्याने माणसाच्या सर्व आर्थिक गरजा भागविल्या जातात. कामाचा हक्क, समान कामासाठी समान वेतन हे हक्क माणसाच्या आर्थिक गरजांमधून किंवा सुखाच्या शोधातून निर्माण झालेले आहेत.

Comments
Post a Comment