मानवी हक्कांचा अर्थ


मानवी हक्क म्हणजे नेमंके काय? मानवी हक्कांचा विचार करता ढोबळपणे आपल्यासमोर राष्ट्रसंघाने जाहीर केलेले सैद्धांतिक व कायदेशीर हक्क येतात, तर काहींच्या मते जगाच्या कानाकोपऱ्यात होणारे हक्कभंग आणि हक्कांची होणारी पायमल्ली या स्वरूपातही मानवी हक्कांच्या संकल्पना सामोऱ्या येतात. काही झाले तरी मानवी हक्कांना आपण
आपल्यापासून वेगळे करू शकत नाही: मानवी हक्कामध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क, अन्न, वस्त्र निवारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य, इत्यादी होत. हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत; स्वतंत्रपणे किंवा समुदायाने जगण्यासंबंधी ची चर्चा हेहकक करतात. हे हक्ष आपणा सर्वांना प्राप्त झालेले आहेत.

मानवी हक्क हे माणसांशी निगडित असतात. आपले जीवन किमान सुखाने व आनंददायीपणे जगण्याच्या आपल्या नैतिक मागणीप्रति हे हक्क नैतिक हमी देण्याचे काम करतात. संकल्पनात्मक परिभाषेत मानवी हक्क' हे हक्क या संकल्पनेतून निर्माण झाले आहेत. या घटकात आपण हक्क
या संकल्पनेच्या तात्त्विक विवेचनावर भर देणार आहोत.
मानवी हक्क ही संकल्पना कोणत्या विविध घटकांपासून तयार झाली आहे; हे स्पष्ट होण्यासाठी य़ा विवेचनाची. मदत होणार आहे
नैतिक हक्कांना काटेकोरपणे हक्क म्हणता येणार नाही परंतु त्याकडे नैतिक मांगणी/दावा म्हणून पाहता येईल; जे कदांचित राष्ट्रीय किंवा आंतररांट्रीय कायद्यांमध्ये समाविष्ट होतीलच असे नाही. नैतिक हकांमुळे प्राप्त होणाऱ्या व्यापंकतेतून मानवी हक्कांना नैतिक पाठबळ मिळते. तरीही नैतिक हकांना मानवी हक्क समजण्याची चूक करता येणार माही. मानवी हक्कांचे कायदेशीर अधिकार हे ते नैतिक हक्क असण्याच्या भूमिकेशी जोडलेले आहेत.

मानवी हक्कांची प्रत्यक्ष परिणामकारकता ही त्यांच्या कायदेशीर हक्कांमध्ये विकसित होण्यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या विशिष्ट मानवी हक्कास कायदेशीर मान्यतां नसते - उदाहरणार्थ, वर्णसंहार विरोध तेव्हा नैतिक हक्कांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. ज्यामुळे पुढील काळात या हक्कांना कायद्याचे संरक्षण देण्यासाठी आवश्यक पूर्वअट म्हणून पाहता येईल. मानवी हक्कांना नैतिक हक्क तसेच कायदेशीर हक्क असेही म्हणता येईल.
आपणाला हे माहीतच आहे, की आपल्या राज्यघटनेने भारतीय नागरिकांना काही मूलभूत हक्क दिलेले आहेत. हे मूलभूत हक्क देण्यामागे प्रत्येकाला समान वागणूक आणि कायद्याचे समान संरक्षण मिळावे हा हेतू आहे. प्रगत आणि विकसनशील देशांमध्येही तेथील लोकांना मूलभूत हक्क मिळालेले आहेत, ज्या आधारे त्यांना सन्मानाने आयुष्य जगतां येते. याचाच अर्थ असा होतो, की सन्मानाने जगण्यासाठी हक्क हे महत्त्वाचे असतात, हे मूलभूत तत्त्व आहे. असे असूनदेखील जगभरात कोट्यवधी लोकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळत नाहीत, जो सर्व मानवी हक्कांचा मूलभूत पाया आहे.

मानवी हक्कांचे आकलन 

मानवी हक्कांबद्दल येथे आपण विस्तृत विचार करू या. मानवी हक्कांचा तीन पातळ्यांवर विचार करता येईल या तिन्ही पातळ्या एकमेकांशी निगडित आहेत, तसेच त्या परस्परांशी देवाण-घेवाणही करतात. त्यां पुढीलप्रमाणे आहेत.

  • मानवी मूल्य 
  • राजकारण 
  • कायदा 

मानवी मूल्य 

आपल्या समाजव्यवस्थेत काही विशिष्ट मानवी मूल्यांचा समावेश आहे. जसे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, राष्ट्रप्रेम, एकात्मता. ज्यांच्या आधारे आपण या हक्कांचा आनंद घेऊ शकतो. आपल्या मूल्यव्यवस्थेची पातळी ही मानवी हक्कांच्या तत्त्वांच्या अंमलबजावणीशी थेट जोडलेली असते. आपल्या दैनंदिन व्यवहारात, सामाजिक संबंध, कामकाजाच्या ठिकाणचे संबंध, आपल्या धार्मिक समजुती आणि आपण आपल्या कुटुंबीयांना व स्वत:ला कशी वागणूक देतो, इत्यादीत आपण मानवी मूल्यांची जपणूक कशी करतो हे तपासावयाचे असेल, तर आपणास स्वत:ला काही प्रश्‍न विचारावे लागतील. आपण परस्परांच्या हक्कांचा आदर राखतो का? आपण एकमेकांचा सन्मानाने जगण्याचा हक्क मान्य करतो का? रोजच्या जीवनात समता, न्याय आणि शांतता या तत्त्वांना आपण चालना देतो का? आपल्या आयुष्यात आलेल्या माणसांचा आपण आदर करतो का? त्यांची काळजी घेतो. का? आपण एका समाजसंस्थेचा भांग असल्यामुळे इतर सर्व माणसांना आदरपूर्वक वागविले पाहिजे म्हणून प्रयत्नशील असतो का? या सर्व प्रश्‍नांची प्रामाणिक उत्तरे मिळाली तर त्यातून मूल्यव्यवस्था आणि मानवीह क्कांची प्रत्यक्ष स्थिती यामधील संबंध स्पष्ट होईल.

राजकारण

मानवी हक्कांची दुसरी पायरी म्हणजे राजकारण होय.
अनेक विद्यार्थ्यांना ती अधिक परिचयाची आहे. लोकशाही
शासनव्यवस्थेत आपल्या हक्कांवर गदा आल्यास किंबहुना
मानवी हक्क नाकारले गेल्यास लोक सामूहिकरित्या सरकारी
ध्येय-धोरणांना विरोध करीत ठामपणे उभे राहू शकतात.
उपेक्षित, वंचित वर्ग समुदायातील लोक एकत्र येऊन, संघटित
होऊन त्यांचे मानवी हक्क मागू शकतात.
आपणांस असेही दिसते, की सरकार इतर राष्ट्रांवर आपला प्रभाव पाडण्यासाठी, ' व्यापारी संबंध निर्माण करण्यासाठी किंवा आर्थिक व इतर मदत करण्याआधी मानवी हक्कांचा वापर करते. तथापि, मानवी हक्कांचे राजकीय स्वरूप हे आपल्या मूल्यांशी आणि नीतितत्त्वांशी निगडित असते. आपण सर्व जण मानवी हक्कांचे कशा प्रकारे संवर्धन करतो हेच शेवटी महत्त्वाचे आहे.

कायदा

मानवी हक्कांमधील तिसरा स्तर हा कायद्याच्या पातळीवरून कार्य करत असतो. त्यातही स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे तीन स्तर आहेत. संयुक्‍त राष्ट्रसंघाने अनेक मानवी हक्क करारनामे व करार-मदारांच्या रूपाने शब्दबद्ध केलेले आहेत. हे सर्व हक्क सभासद देशांकडून मान्य करून सुनिश्चित केलेले आहेत. याचाच अर्थ असा, की ही सर्व राष्ट्रे याच्याशी बांधील आहेत. या सर्व दस्ताऐवजांच्या मुळांशी संयुक्त राष्ट्रसंघाने १९४८ मध्ये संमत केलेला मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा आहे.

अन्य बाबतीत त्या त्या देशांची राज्यघटना हीच मानवी हक्कविषयक तत्त्वाचे प्रतिनिधित्व करत असते. त्या तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कायदे तंयार करते. मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे असणे करणे गरजेचे असते, कारण काही लोक वा संस्था ज्या इतरांना दुखावत, निर्भत्सना करीत त्यांच्या हक्कांवर गदा आणतात, त्यांच्या हक्कांना नाकारतात अशांना शिक्षा झालीच पाहिजे आणि हे सर्व शकय आहे ते कायद्याच्या आधारेच. पुष्कळदा या कायद्यांची ताकद ही सर्वसामान्य जनतेच्या मूल्यांवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे लोकांना संघटित करण्याच्या स्तरावरही अवलंबून असते. अशा तऱ्हेने मानवी हक्क हे मूल्य, राजकारण व कायदा या तीनस्तरांवर परस्परपूरक अशां पद्धतीने एकाच वेळी कार्यरत असतात. कायद्याच्या मदतीने मानवी हक्कांची अंमलबजावणी करताना राजकीय दबावाशी सामना करावा लागतो, ज्यामुळे सर्वसामान्यांचा कायद्यावरून विश्‍वास उडू लागला आहे असे चित्र दिसते.

मानवी हक्कांची व्याख्या

सर्व मानवांना नैसर्गिक हक्क असतात. त्यांचे हक्क स्वत:कडून, संबंधित राष्ट्राकडून संरक्षित केले गेले पाहिजेत. मानवी हक्क म्हणजे असे हक्क जे सर्व माणसांना असतात आणि जे त्यांच्यापासून वेगळे करता येत नाहीत. संयुक्त राष्ट्रसंघाने १९४८ साली मांनवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा प्रसृत केला आणि मानवतेच्या विविध प्रश्‍नांवर
करारनामे केले. या करारनाम्यांना सभासद राष्ट्रांनी मंजुरी
देऊन या करारनाम्यांशी प्रतिबद्ध व्हावे यासाठी राष्ट्रसंघ
प्रयत्नशील आहे. राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतर मानवी हक्कांना औपचारिक व वैश्‍विक स्वरूप प्राप्त झाले.

मानवी हक्क म्हणजे, असे सर्व हक्क जे प्रत्येकास निसर्गत:च मिळालेले असतात. ज्यांच्याशिवाय आपण माणूस म्हणून जगू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे मानंवी हक्क जन्मत: मिळालेले असे हक्क आहेत, जे माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी, संवर्धनासाठी, बौद्धिक, वैचारिक व सदसदविवेकबुद्धीच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहेत. तसेच ते मानवाच्या आध्यात्मिक व इतर गरजा भागविण्याकरिता आवश्यक असतात.

मानवी हक्कांची व्याप्ती मोठी आहे. यात एकीकडे पारंपरिक हक्क आणि राजकीय हक्क यांचा तर दुसरीकडे नव्याने विकसित झालेल्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या हक्कांचाही समावेश होतो. माणूस हा जन्मतः हक्क आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने समान आहे. हे हक्क म्हणजे नैतिक अधिकार असतात, जे माणसांपासून वेगळे करता न येणारे जन्मसिद्ध हक्कं असतात. मानवतेच्या गुणांमुळेच ते प्राप्त झालेले आहेत. हे नैतिक हक्क मानवी हक्क म्हणून उल्लेखिले जातात आणि त्यानंतर त्यांचे कायदेशीर हक्कांमध्ये रूपांतर होते. मानवी हक्काशिवाय आपण माणूस म्हणून जगू शकत नाही हे आता सिद्ध झाले आहे. या सर्व हक्कांमध्ये सर्व मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीविताची हमी, प्रतिष्ठा व मूल्ये यांचा आदर राखला जातो. संरक्षण मिळणे हे मानवी हक्कांचे आधारभूत तत्त्व आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण एकमेकांच्या गरजा व हक्क यांचा आदर राखू व काळजी घेऊ.

प्रत्येक स्त्री-पुरुष हे समाजाचे घटक असतात. ते
एकमेकांवर अवलंबून असतात. हक्क आणि प्रतिष्ठेच्या
बाबतीत ते समान असतात. सद्‌सद्‌विवेकबुद्धी आणि समज
यांनी ते प्रेरित झालेले असतात; त्यातूनच मानवी हक्कांची
संकल्पना उदयास आली आहे. समाज हा राजकीय तत्त्वप्रणालीने चालतो. ही तत्त्वप्रणाली समाजाचे सदस्य, संस्था, संघटना यांच्या कृतीला औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही तऱ्हेने नियंत्रित करीत असते. प्रत्येक शासनावर नागरिकांचे मानवी हक्क संरक्षित करण्याची व त्यांची हमी देण्याची जबाबदारी असते. जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि सुरक्षिततेचा हक्क हे मूलभूत हक्क आहेत. हे हक्क सर्व नागरिकांना मिळावेत याची काळजी शासनाने घेतली पाहिजे; त्यात धर्म, जात, वंश,' वर्ण, लिंग आणिज न्यस्थान या आधारे कोणताही भेदभाव करता कामा नये.प्र त्येक माणसाला कायद्याच्या मदतीचा आणि संरक्षणाचा हक्क असतो. कायदेशीर प्रक्रियेशिवाय कोणालाही अटक
अथवा शिक्षा करता येत नाही.

माणसे एकमेकांपासून भिन्न असतात, पंरंतु मानवी हक्कांच्या संकल्पनेनुसार मनुष्य कुठल्याही धर्म, जात, जमात, वर्ण, लिंग, भाषा वंश व जन्मस्थळाचा असला तरी तो समान असतो. त्याला समानतेची वागणूक मिळायला हवी. मानवी व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याची हमी देणे हा सर्व समाजांचा आणि त्यांच्या शासनांचा मूळ हेतू असतो. जगण्याचा हक्क हा नैसर्गिक हक्क आहे, मात्र सन्मानपूर्वक जीवन जगणे हां मूलभूत हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जीवन जगण्याची हमी देण्याच्या राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय संस्था संघटनांच्या उद्दिष्टांमधून मानवी हक्कांची संख्या व व्याप्ती यांत सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक बालकांस जगण्याचा, स्वातंत्र्याचा व सुरक्षिततेचा हक्क आहेच, मात्र याबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि इतर हक्क हे त्याला सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात.

प्रत्येकास शिक्षण घेण्याचा हक्क आहे. प्रत्येकबा लकाला शाळेत जाण्याचा हक्क आहे, म्हणून प्राथमिक स्तरावरील शिक्षण मोफत असायला हवे. प्रत्येकास आरोग्यांचा हक्क आहे. विशेषतः प्रत्येक बालकास वाढण्याचा, कुटुंबाकडून, सरकारकडून, प्रेम, वात्सल्य आणि काळजी मिळविण्याचा हक्क आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे आरोग्य सुरक्षित राहिले पाहिजे व त्यांची काळजी घेतली पाहिजे.

संमता व प्रतिष्ठा ही मानवी हकांची मूलभूत तत्त्वे आहेत. सर्व मुलांना शिक्षणाचा व आरोग्य सेवांचा आणि इतर हक्कांचा लाभ घेण्याची समान संधी मिळावी, म्हणून सर्वच शासन आणि समाज घटकांनी कर्तव्यदक्ष असले पाहिजे. याबरोबरच हे सर्व हक्क त्यांना त्याच्या प्रतिष्ठेसह मिळायला हवेत, याचीही काळजी घ्यायला हवी. बालकांचे जगण्याचे, शिक्षणाचे व आरोग्याचे प्रतिष्ठेसह असलेले हक्क हे अबाधित व अनिर्बंध आहेत. एकीकडे शासनांने घटनात्मक बंधने पाळली पाहिजे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा समाजाचे जबाबदार घटक म्हणून आपणही नैतिकदृष्ट्या समाजात शारीरिक, मानसिक व सामाजिक सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास बांधील असतो. आपल्या व॑ इतरांच्या हक्कांप्रति आदर निर्मोण करण्याविषयी. समज आणि जागरूकता निर्माण करण्याचें हे पाहिले पाऊल ठरेल.

Comments

Post a Comment

Postingan Populer

मानवी हक्क म्हणजे काय?