Posts

Featured Post

मानवी हक्कांचा अर्थ

Image
मानवी हक्क म्हणजे नेमंके काय? मानवी हक्कांचा विचार करता ढोबळपणे आपल्यासमोर राष्ट्रसंघाने जाहीर केलेले सैद्धांतिक व कायदेशीर हक्क येतात, तर काहींच्या मते जगाच्या कानाकोपऱ्यात होणारे हक्कभंग आणि हक्कांची होणारी पायमल्ली या स्वरूपातही मानवी हक्कांच्या संकल्पना सामोऱ्या येतात. काही झाले तरी मानवी हक्कांना आपण आपल्यापासून वेगळे करू शकत नाही: मानवी हक्कामध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क, अन्न, वस्त्र निवारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य, इत्यादी होत. हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत; स्वतंत्रपणे किंवा समुदायाने जगण्यासंबंधी ची चर्चा हेहकक करतात. हे हक्ष आपणा सर्वांना प्राप्त झालेले आहेत. मानवी हक्क हे माणसांशी निगडित असतात. आपले जीवन किमान सुखाने व आनंददायीपणे जगण्याच्या आपल्या नैतिक मागणीप्रति हे हक्क नैतिक हमी देण्याचे काम करतात. संकल्पनात्मक परिभाषेत मानवी हक्क' हे हक्क या संकल्पनेतून निर्माण झाले आहेत. या घटकात आपण हक्क या संकल्पनेच्या तात्त्विक विवेचनावर भर देणार आहोत. मानवी हक्क ही संकल्पना कोणत्या विविध घटकांपासून तयार...

मानवी हक्क म्हणजे काय?

Image
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ सालमंड यांच्या मते, कर्तव्य म्हणजे असे कार्य जे एखाद्याने केलेच पाहिजे. जसे- नोकराने मालकाची सेवा करणे, मुलाने आई-वडिलांची आज्ञा पाळणे, कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश पाळणे, इत्यादी. कर्तव्यात अशा सर्व कार्यांचा समावेश होतो जी एखाद्याने केली पाहिजे, तसेच अशी कार्ये जी. एखाद्याने करायला नकोत. आपण यांना सकारात्मक किंवा नकारात्मक म्हणू शकतो. वाहन  चालविताना वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत हे सकारात्मक कर्तव्य आहे; तर एखाद्या मालकाच्या खाजगी जागेत प्रवेश करणे हे असे काम आहे जे करायला नको, म्हणजेच ते नकाशत्मक कर्तव्य होय. कर्तव्ये दोन प्रकारची  यासतात- पहिले नैतिक तर दुसरे कायदेशीर. कायद्याने  बंधनकारक असणारे कर्तव्य म्हणजे कायदेशीर कर्तव्य, तर॒ नैतिक कर्तव्य म्हणजे असे कर्तव्य जे आपल्या बिवेकानुसार, सद्‌सदविवेकबुद्धीनुसार योग्य किंवा अयोग्य ठरवून आपण करतो ते. उदाहरणार्थ, अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करणे हे नैतिक कर्तव्य आहे. कायद्याने जेव्हा एखादी कृती कर्तव्य मानली जाते, तेव्हा कायदा तिच्या अंमलनजावणीवर भर देतो व त्याकडे दु...